Saturday, July 5, 2025
Homeक्रीडाआयपीएलमध्ये मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू इतक्या लाखांना, सामान्य माणसााचा वर्षाचा पगारही तितका...

आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू इतक्या लाखांना, सामान्य माणसााचा वर्षाचा पगारही तितका नाही

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता वेध लागले आहेत ते आयपीएलचे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला मिनी ऑक्शन पार पडला. या लिलावात 10 फ्रँचाईजीने 72 खेळाडूंवर तब्बल 230 कोटी रुपये खर्च केले. या वेळच्या लिलाव प्रक्रियेत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं वर्चस्व पाहिला मिळालं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कर्णधार पॅट कमिन्सnआणि विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजयी शतक ठोकणाऱ्या ट्रेव्हिस हेडवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली.

स्टार्क-कमिन्सवर 45 कोटी खर्चमिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी अक्षरश: चढाओढ पाहिला मिळाली अखेर कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाखांची बोलीव लावत स्टार्कला आपल्या संघात घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली ठरली. तर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पॅट कमिन्सवर सनरायजर्स हैदराबादने तब्बल 20.50 कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 कोटींचा टप्पा पार झाला. याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन हा आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू होता. आयपीएल ऑक्शन 2023 मध्ये पंजाब किंग्सने सॅम करनला 18.50 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -