ताजी बातमी /online team
येथील दाजीपूर अभयारण्यात 30 व 31 डिसेंबर या कालावधीत दोन दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद – ठेवण्यात येणार असल्याची माहिती दाजीपूर वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे.
राधानगरी 2 तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवा रेडा, पट्टेरी वाघ व इतर प्राणी अश्या दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून इथे महाराष्ट्रतून पर्यटक संख्येने येतात. ३१ डिसेंबर वर्षअखेर असल्याने व नवं वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाने ३0 व 31 डिसेंबर या दोन दिवसांसाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
३0.व 31 डिसेंबर या दिवशी विनापरवाना अभयरण्यात प्रवेश करणें, मद्य पिणे, गाणी वाजविणे, प्लास्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत पर्यटकांनी बंदी असल्याने येऊ नये, असे आवाहन वन्यजीवचे वनक्षेत्रपाल अजित माळी व सुहास पाटील यांनी केले आहे.