Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपत्नीला पळवून नेल्याच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण

पत्नीला पळवून नेल्याच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण

Taji Batmi/online team

पत्नीला पळवून नेल्याच्या संशयातून युवकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.पत्नीला पळवून नेल्याच्या संशयातून युवकाला खालसा म्हाळुंगे येथील पतीसह अकरा जणांनी  मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी नागेश गुरव वय वर्षे २१ (रा.खालसा म्हाळुंगे ता.चंदगड, जिल्हा कोल्हापूर  ) याने चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

निवृत्ती शेट्टी यांनी पत्नी बेपत्ता होती.ती गोव्यात सापडली. पण तिला फिर्यादी नागेश यांने पळवून नेल्याच्या संशयातून निवृत्ती वैजू शेट्टी,सुनिल वैजू शेट्टी,भीमराव देसाई,सोमनाथ लक्ष्मण गावडे,सोमनाथ दत्तू गावडे,विक्रम रामलिंग पाटील, विशाल नागेश कोदाळकर,दिपक पांडुरंग गावडे,गणपत मोतीराम दळवी,महादेव गणपत गावडे, सातेरी लक्ष्मण डांगे (सर्व रा. खालसा म्हाळुंगे ता.चंदगड) अकरा जणांनी म्हाळुंगे ते कोलीक रस्त्यावरील एका काजू बागेत नेऊन काठी व लाथाबुक्यांनी पायावर व गालावर जबर मारहाण केली.

यामध्ये फिर्यादी नागेश हा गंभीर जखमी असून मारहाण प्रकरणी अकरा जणांविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हे.कॉ.कोगेकर करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -