Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगनववर्षात आर्थिक गुड न्यूज! सरकारी तिजोरीत आला १२ टक्के अधिक पैसा; आयटीआर...

नववर्षात आर्थिक गुड न्यूज! सरकारी तिजोरीत आला १२ टक्के अधिक पैसा; आयटीआर भरणारे करदाते ९% वाढले

 

 

२०२३ संपले अन् नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाला तीन आर्थिक गुड न्यूज मिळाल्या. देशात संकलित होणाऱ्या जीएसटीचे उत्पन्न तब्बल १२ टक्क्यांनी वाढले तर आयटीआर फाईल करणाऱ्यांची संख्याही ९ टक्क्यांनी वधारली आहेत्यातच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात किरकोळ कपात झाली असून, विमान इंधनाचे दर घटल्याने ४ हजार रुपयांची बचत होणार आहे.

 

डिसेंबरमध्ये सरकारच्या तिजोरीत १.६४ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. वार्षिक आकडेवारी पाहता जीएसटी संकलनात १० टक्के वाढ झाली आहे. सोमवारी अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. मागील वर्षी याच कालखंडात १.४९ लाख कोटी इतके जीएसटी संकलन झाले होते. विशेष म्हणजे मागील सलग सात महिने जीएसटी संकलन १.६० लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे.

 

विमान इंधनाच्या किमतीत ४ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत याचा दर १,०१,९९३ रुपये प्रति किलो लीटर असेल. त्यामुळे ४,१६२ रुपये वाचणार आहेत.

 

८.१८ कोटी विक्रमी आयटीआर दाखल

– २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३१ डिसेंबरपर्यंत देशभरात ८.१८ कोटी इतके विक्रमी आयटीआर दाखल करण्यात आले. २०२२ मध्ये ३१ डिसेंबरपर्यंत ७.५१ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. वर्षभरात यात ९टक्क्यांनी वाढ झाली आहे.

– २०२३-२४ मध्ये दाखल करण्यात आलेले लेखापरीक्षण अहवाल आणि इतर अर्जांची संख्या १.६० कोटी इतकी होती तर मागील वर्षात हीच संख्या १.४३ कोटी इतकी होती, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे.

 

जीएसटी : १४.९७ लाख काेटींवर

– एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत एकूण जीएसटी संकलन १२ टक्क्यांनी वाढून १४.९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती मंत्रालयाने दिली.

– मागच्या वर्षी समान कालखंडात जीएसटी संकलन १३.४० लाख कोटींवर पोहोचले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत १.६६ लाख कोटी इतके सरासरी जीएसटी संकलन झाले.

– मागील वर्षीच्या याच नऊ महिन्यांचे सरासरी जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी इतके होते.

 

मंत्रालयाने स्पष्ट केेले की, डिसेंबरमधील एकूण जीएसटी संकलन १,६४,८८२ कोटी होते. यात सीजीएसटीतून ३०,४४३ कोटी, एसजीएसटीतून ३७,९३५ कोटी तर आयजीएसटीतून मिळालेल्या ८४,२५५ कोटी रुपयांचा समावेश आहे. याखेरीज उपकरांच्या रूपातून १२,२४९ कोटी रुपये सरकारला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -