Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगदगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण

दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण

 

 

टाइमपास’ या चित्रपटात दगडूची भूमिका साकारून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यात आता ‘प्राजू’ची कायमची एण्ट्री झाली आहे. प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधणार आहे. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. प्रथमेश आणि क्षितिजा हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघंही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहेत. प्रथमेश आणि क्षितिजाचं केळवण नुकतंच पार पडलं आहे. त्याचाच फोटो पोस्ट करत त्याने लग्नाची घोषणा केली आहे.‘#प्रतिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (ता. क. – तारीख खूपच स्पेशल आहे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. कमेंटमध्ये अंदाज व्यक्त करा. तोवर नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)’, असं त्याने या केळवणाच्या फोटोसोबत लिहिलंय. या फोटोवर नेटकऱ्यांसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स करत प्रथमेश आणि क्षितिजाला शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने त्याच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. प्रथमेश हा फॅशन मॉडेल क्षितिजा घोसाळकरला डेट करतोय. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘टाइमपास’ या चित्रपटात ‘दगडू’ने ‘प्राजू’चं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्याची ही अनोखी प्रेमकहाणी सर्वांना खूप आवडली होती. खऱ्या आयुष्यात आता प्रथमेश क्षितिजासोबत संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी सज्ज झाला आहे.प्रथमेशची होणारी पत्नी कोण?

व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत प्रथमेश परबने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यापूर्वीही दोघांचे सोबत फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्याविषयी अंदाज बांधण्यास सुरुवात केलीच होती. प्रथमेशची गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी क्षितिजा ही फॅशन डिझायनर आहे. त्याचसोबत ती बायोटेक्नॉलॉजिस्टसुद्धा आहे. प्रथमेशला ‘टाइमपास’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाशिवाय त्याने टकाटक 1, टकाटक 2, 35 टक्के काटावर पास, बालक पालक, डॉक्टर डॉक्टर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -