Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता; जाणून घ्या आजचे हवामान कसे असणार

राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता; जाणून घ्या आजचे हवामान कसे असणार

 

 

उत्तर भारतात थंडीची लाट अजूनही कायम असली तरी महाराष्ट्रात थंडीचा तडाखा कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज (दि.२) रोजी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तर राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.राज्यातील तापमानात दिवसा वाढ होत आहे तर रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

दरम्यान, वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाली आहे. यामुळे देशाच्या काही भागासह राज्यात पावसाचा शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई आणि नवी मुंबईत मात्र तापमानात होणारी वाढ कायम आहे. तापमानात वाढ झाल्यास नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -