अष्टपैलू हार्दिक पांड्याला टी-20 फॉरमॅटसाठी टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणून ओळखले जात आहे, परंतु बोर्ड आणि निवडकर्त्यांनी कहाणीत थोडा ट्विस्ट आणला आहे. जिथे पुन्हा एकदा रोहित दीड वर्षांनंतर टी20 फॉरमॅटमध्ये परतला आहे आणि तो अफगाणिस्तानविरुद्ध (indian team) भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे आणि हार्दिकला ही गोष्ट फारशी आवडलेली दिसत नाही.अफगाणिस्तानविरुद्धही हार्दिक पांड्या परतला नाही
अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांसाठी (indian team) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून, हार्दिक पांड्या या संघात नाही. ज्यानंतर हार्दिक अजून तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा परिस्थितीत तो आयपीएलच्या माध्यमातून मैदानात परतताना दिसणार आहे. 2023च्या विश्वचषकादरम्यान हार्दिकला बांगलादेशविरुद्ध दुखापत झाली होती, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.हार्दिक पांड्या आता रोहितच्या कर्णधार झाल्याबद्दलचा राग काढत आहे?
असे असले तरीही, हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट करत तो लवकरच मैदानात उतरण्यासाठी फिट असल्याचे संकेत दिले आहेत. हा खेळाडू त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये जिममध्ये खूप मेहनत घेताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की हार्दिक रागाच्या भरात वर्कआउट करण्यात व्यस्त आहे. कदाचित पंड्याला रोहितला पुन्हा टी-20 कर्णधार बनवणं आवडलं नसावं, अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.