कोल्हापूर दिनांक 10 नोव्हेंबर 21 रोजी कोल्हापूर येथे अखिल भारतीय बहुजन सेवा संघटनेची मीटिंग घेण्यात आली. मीटिंग मध्ये श्रीमती भारती फडके यांची हातकणंगले तालुका महिला सचिव पदी निवड करण्यात आली. तसेच बेबी साळुंखे यांची हातकणंगले तालुका महिला संघटक पदी निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे पत्र माननीय संस्थापक अध्यक्ष श्री अण्णाप्पा खमले हट्टी यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री शिवाजी लोखंडे, श्री आनंदा कांबळे, जिल्हा सचिव सरचिटणीस श्री हौशे राव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती शोभा कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सौ तनुजा चोपडे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष श्रीमती सविता कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री संजय कांबळे, करवीर तालुका कार्याध्यक्ष श्री विश्वास चोपडे, जिल्हा कार्याध्यक्ष सौ कुंदा धनवडे, श्रीमती सुमन पाटील, हातकणंगले तालुका सरचिटणीस श्रीमती नीता तळेकर, श्रीमती विजया पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री महावीर घसते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघटनेने जिल्ह्यामध्ये शाखा उघडणे, संघटना बळकट करणे व अनेक शासकीय प्रश्नाची कामे करून घेण्याचे ठरविले. तसेच संघटनेची जिल्ह्यावर ब्लॉक कमिट्या स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे ठरविण्यात आले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -