Saturday, January 24, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर विधान परिषद निवडनुकित इचलकरंजी केंद्रस्थानी

कोल्हापूर विधान परिषद निवडनुकित इचलकरंजी केंद्रस्थानी

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येमुळे इचलकरंजी राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. प्लस व मायनस याचे आडाखे बांधतानाच नेत्यांकडूनही सावध पावले टाकण्यात येत आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी इचलकरंजी मतदारांच्या भेटीगाठीसाठी तळ ठोकला होता. दरम्यान, अमल महाडिक व त्यांच्या समर्थकांकडूनही शहरात हालचाली सुरू असून आ. प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह अन्य भाजप मित्रपक्षांशी संपर्क साधण्यात येत आहे. जि.प. सदस्य राहुल आवाडे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

इचलकरंजीत काँग्रेसचे 19 नगरसेवक असून त्यापैकी आवाडे समर्थक 14, भाजपचे 16, राजर्षी शाहू आघाडी (कारंडे गट) 11, राष्ट्रवादीतील जांभळे गटाचे 8, सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीचे 13 नगरसेवक तर शिवसेनेच्या एक नगरसेविका आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -