Friday, August 8, 2025
Homeब्रेकिंगदुर्दैवी! तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, पंढरपूरमधील घटना

दुर्दैवी! तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, पंढरपूरमधील घटना

 

 

एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने करकंब गावात शोककळा पसरली आहे.

 

मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. गणेश नितीन मुरकुटे (वय 7 वर्ष), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय 8 वर्ष) आणि मनोज अंकुश पवार (वय 11 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही तीन लहान मुलं खेळत असताना शेततळ्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुलं संध्याकाळ झाली तरी घरी परतली नसल्याने त्यांच्या आईवडिलांनी शोध सुरू केला.

त्यावेळी घराच्या जवळच असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.मुलांना तातडीने करकंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिन्ही मुलांना मृत घोषित केले. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -