Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगमांडव सजला, वऱ्हाडी आले, लग्न लागण्यापूर्वीच पोलिसांची एन्ट्री; नवरा पसार, नववधू पोलिसांच्या...

मांडव सजला, वऱ्हाडी आले, लग्न लागण्यापूर्वीच पोलिसांची एन्ट्री; नवरा पसार, नववधू पोलिसांच्या ताब्यात, नेमकं घडलं काय?

 

 

लग्नाच्या दिवशी एका वधूला अटक करण्यात आली आहे. हातात पोलिसांच्या बेड्या असलेला या नववधूचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.लग्न (Wedding) म्हणजे, प्रत्येक तरुणीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. या दिवसानंतर मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. माहेर सोडून ती सासरी जाते आणि नव्या आयुष्याला सुरुवात करते.

लग्नासारखा सुखद दिवस एका तरुणीसाठी मात्र शिक्षा ठरला आहे. पण लग्न लागण्यापूर्वीच या नववधूचं नशीब असं पालटलं की, तिला थेट तुरुंगवारीच नशीबात आली. एकीकडे तुरुंगवारी आणि दुसरीकडे ज्याच्याशी लग्नगाठ बांधणार होती, तो भर मांडवात सोडून पसार झाला. 

लग्नाच्या दिवशीच या तरुणीच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या नववधूच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडण्यासाठी कारणीभूत दुसरं तिसरं कोणीच नसून तिचा मांडवातून पसार झालेला पतीच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी एका वधूला अटक करण्यात आली आहे. हातात पोलिसांच्या बेड्या असलेला या नववधूचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ही तरुणी नववधू साजात असून तिच्या हातात पोलिसांच्या बेड्या दिसत आहेत.

नववधूनं पांढरा गाऊन घातला आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेत (America) घडली असून भर लग्नसोहळ्यात घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. अमेरिकेत राहणारी नॅन्सी लिझेथ ही आपली लग्नगाठ क्लेमेंटे मेंडिओला मार्टिनेज या तरुणाशी बांधणार होती. लग्नसोहळ्याचा मांडव सजला होता, वऱ्हाडी मांडवाल होते. पण अचानाल भर लग्नसमारंभात पोलिसांनी एन्ट्री घेतली. लग्नसमारंभात अचनाक पोलीस आले. नॅन्सी ज्याच्यासोबत लग्न करणार होती, तो तरुण एक सराईत गुन्हेगार होता.

त्याचं नाव क्लेमेंटे मेंडिओला मार्टिनेज असून त्याला ‘एल रोटन’ आणि ‘एस माऊस’ म्हणूनही ओळखलं जात होतं. त्याच्यावर मेक्सिकोमधील ड्रग कार्टेलसाठी हत्या केल्याचा आरोप होता.मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, व्हायरल फोटोमध्ये लिझेथ म्हणजेच, नववधू ज्या लोकांसोबत उभी आहे, ते देखील याप्रकरणातील संशयास्पद आरोपी असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे सर्वजण लग्नाचे पाहुणे होते. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा लग्नसमारंभात गेला आणि घटनास्थळावरुन सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लग्नसमारंभात छापा टाकला, तेव्हा मार्टिनेझ पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलिसांनी नववधूला वधूला अटक केली.

मार्टिनेझ हा मोठा कार्टेल मेंबर असल्याचं बोललं जात आहे. स्थानिक पोल्ट्री फार्मर्सकडून खंडणी रॅकेटशी संबंधित एका खुनाच्या गुन्ह्यात तो वाँटेड असल्याचंही सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस आणि फिर्यादी नववधूला त्यांच्या काळ्या कामांतील त्याची साथीदार मानतात. नववधूही मार्टिनेझच्या सर्व काळ्या कामांत सहभागी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एवढंच नाहीतर नववधूवरही खंडणीचे आरोप लावण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हत्या आणि खंडणीच्या गुन्हेगारी कारवायांमुळे मार्टिनेझ हे पहिले लक्ष्य होते, असं पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आहे.

लिझेथला ज्या दिवशी मार्टिनेझसोबत लग्न करायचं होतं, त्याच दिवशी पोलिसांनी एन्ट्री घेतली आणि सर्वांना अटक करण्यात आली. दरम्यान, मेक्सिकन पोलिसांनी मार्टिनेझबाबत माहिती देणाऱ्यासाठी 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -