जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रविवारी दुपारी क्रिकेटच्या सामन्यावरून पेटलेल्या वादातून १२ जणांच्या टोळक्याने एका Police constable killed पोलिस हवालदाराची हत्या केलीPolice constable killed या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, शुभम अगोनेअसे हत्या झालेल्या Police constable killed पोलिस हवालदाराचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा तो त्याच्या गावी होता.
शुभम हा चाळीसगाव येथे आयोजित क्रिकेट सामना जिंकणाऱ्या संघाचा एक भाग होता. सामन्यानंतर शुभमची प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी शाब्दिक बाचाबाची झाली होती. याचा राग डोक्यात ठेवून प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी रविवारी रात्री शुभम आणि त्याच्या मित्राला घेराव घातला व तलवारी आणि क्रिकेटच्या स्टम्पने मारहाण केली. या घटनेत शुभमचा मृत्यू झाला. त्याचा मित्र आनंदलाही गंभीर दुखापत झाली.