Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रआता स्मार्टफोन्स होणार स्वस्त! अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारचं गिफ्ट; आयात शुक्ल केलं...

आता स्मार्टफोन्स होणार स्वस्त! अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारचं गिफ्ट; आयात शुक्ल केलं कमी

भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी देशाचं अंतरिम बजेट सादर करतील. मात्र यापूर्वीच मोदी सरकारने देशवासीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे.मोबाईल फोन उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कंपोनेंट्स आणि पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे शुक्ल पूर्वी 15 टक्के होतं, जे आता 10 टक्के करण्यात आलं आहे.

 

सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार, सिम सॉकेट, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल आणि अन्य मेकॅनिकल पार्ट्सवर लागणारे आयात शुल्क आता पाच टक्के कमी असणार आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे.सरकारच्या या निर्णयानंतर आता भारतात कमी किंमतीमध्ये स्मार्टफोन तयार होणार आहेत.

यामुळे ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात स्मार्टफोन निर्मितीला भरपूर चालना मिळाली आहे. त्यामुळे कित्येक लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.सॅमसंग-अ‍ॅपल

 

‘मेक इन इंडिया’ अभियानामुळे कित्येक जागतिक कंपन्या भारतात स्मार्टफोनचे उत्पादन घेत आहेत. अ‍ॅपल आणि सॅमसंग या दिग्गज कंपन्यांनी आपले नवे मॉडेल्स भारतात तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे आता या मोठ्या कंपन्यांचे भारतात तयार केलेले स्मार्टफोन देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -