सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. या मेसेजमुळं मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.एएनआयच्या ट्विटनुसार, मुंबई वाहतूक पोलीस कन्ट्रोल रुमला हा धमकीचा मेसेज आला आहे. एका अनोळखी व्यक्तीनं हा मेसेज पाठवला असून हा व्यक्ती कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.मेसेजमध्ये काय म्हटलंय?
मुंबईतील विविध सहा ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. हा मेसेज गांभीर्यानं घेत पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मेसेज करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.