ताजी बातमी टीम :
सुळकुड पाणी प्रश्न पुन्हा पेटणार असून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्धार सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीवेळी करण्यात आला. पाणी प्रश्नासाठी आमदार आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांना इचलकरंजी कराने बहुमताने निवडून दिले होते. इचलकरंजी चा पाणी प्रश्न सोडवा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याची जागा दाखवून देऊ असा इशाराही कृती समितीच्या नेत्यांनी दिला आहे.
एसटीत कंडक्टरचे खिसे तपासण्याचे आदेश, महीला कर्मचारी वर्ग संतापला, पत्रक मागे घेण्याची मागणी
इचलकरंजी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक योजना इचलकरंजीसाठी मंजूर झाल्या परंतु या योजना पूर्णत्वास येण्याआधीच इचलकरंजीच्या दोन्ही नेत्यांनी यामध्ये राजकारण केले असून पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पाणी योजनेच्या मेळाव्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.
Paytm वरून मिळवा कुठल्याही गॅरंटीशिवाय २ मिनिटात २ लाखांपर्यंत कर्ज (instant Personal Loan 2024)
सुळकुड पाणी योजनेच्या प्रश्नी शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली होत नसल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी मध्ये सुळकुड पाणी योजना कृती समिती च्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर टीकेची झोड उठवत निषेध व्यक्त केला.
इचलकरंजीला पाणी मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शहरातील सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार या सभेमध्ये करण्यात आला. कृती समितीच्या नेत्यांना बिनकामाचे टोळकं असं आमदार आवाडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केले होते त्याचा सर्वच नेत्यांनी खरपूस भाषेत समाचार घेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवून देऊ असा इशाराही यावेळी दिला.
पुंडलिकराव जाधव, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, अभिजीत पटवा ,भरमा कांबळे, प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, नितीन जांभळे यांचे सह नागरिकांनी आपल्या मनोगतामध्ये आमदार आवाडे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. सदर मेळाव्यामधे प्रताप पाटील राजू कुन्नूर, शशिकांत देसाई ,राहुल सातपुते बजरंग लोणारी ,नूरमहंमद बेळकुंडे,सुनील बारवाडे, डॉ.अरुण पाटील, सावित्री हजारे, माधुरी सातपुते, सुरेश गणबवले,यांच्यासह नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कृती समितीचे निमंत्रक, सदस्य व बहुतांश नागरिक उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.