Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग1 लाखाचे झाले 64 लाख, या कंपनीचा बोलबाला, शेअर बाजारात ठरली किंग!

1 लाखाचे झाले 64 लाख, या कंपनीचा बोलबाला, शेअर बाजारात ठरली किंग!

आजघडीला शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. तरीदेखील बाजाराचा योग्य अभ्यास करून लालसेला बळी न पडता गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. सध्या अशाच एका कंपनीने गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे.

 

या कंपनीचे नाव नेटवर्क पिपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजिज (Network People Services Technologies) असे आहे. हा एक मल्टिबॅगर शेअर आहे. या कंपनीच्या शेअरने चार वर्षात मोठी मजल मारलेली आहे. या शेअरमध्ये चार वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर त्या पैशांचे मूल्य आजघडीला तब्बल 64.5 लाख रुपये झाले आहे.

 

शुक्रवारी या शेअरचे मूल्य 1400 रुपये होते. ही कंपनी डिजिटल बँकिंग आणि पेमेंट टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करते. या कंपनीच्या शेअरमध्ये जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 या काळात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाले. वर उल्लेख केलेल्या अडीच वर्षांच्या काळात या कंपनीच्या शेअरने 16,270 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत.

 

या मल्टिबॅगर स्टॉकने गेल्या 26 महिन्यांत पॉझिटिव्ह क्लोजिंग देत बाजारात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. डिसेंबर 2022 मध्ये या कंपनीचा शेअर एका महिन्यात साधारण 90 टक्क्यांनी वधारलेला आहे. जुलै 2024 मध्ये या कंपनीच्या शेअरने 65 टक्क्यांनी झेप घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -