Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीसायझिंग बंदच्या आंदोलनामुळे वस्त्रोद्योग होणार ठप्प : कामगारांवर उपासमारीची वेळ?

सायझिंग बंदच्या आंदोलनामुळे वस्त्रोद्योग होणार ठप्प : कामगारांवर उपासमारीची वेळ?

ताजी बातमी टीम :

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील सायझिंग उदयोग बंद ठेवण्याच्या आंदोलनामुळे साडेचार हजार कामगारावर उपासमारीची वेळ येणार असून वस्त्रोंद्योगातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. सदरचे आंदोलन ताणले गेले तर इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील सर्वच घटक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इचलकरंजी : सुळकुडच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार कृती समिती आक्रमक: रस्त्यावरच्या लढाईला सज्ज

प्रादेशिक प्रदूषण मंडळाने इचलकरंजी शहरातील सायझिंग उद्योगां मधील उद्योगांना गतवर्षी आठ व सध्या चार सायझिग उद्योगांगा परवाना नुतनीकरण करण्यासाठी लावलेल्या दंडाची रक्कम भरली नसल्यामुळे क्लोजर नोटीस बजावली आहे. दर पाच वर्षांनी सायझिंग उद्योगाला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानाचे नूतनीकरण करणे गरजेचे असते.

महिलेवर सामूहिक बलात्कार करून लग्नासाठी कर्नाटकात विकलं

यासाठी सायझिंग धारकांनी रीतसर अर्ज करून नूतनीकरणासाठी असणारी आवश्यक फी भरली असतानाही ऑगस्ट 2023 मधील परिपत्रकाचा आधार घेत दंडाची आकारणी करण्याच्या नोटीस बजावल्या होत्या.सदरच्या नोटीस या बेकायदेशीर असून कोणतेही प्रदूषण होत नसताना सदरच्या काढलेल्या नोटिसा या बेकायदेशीर आहेत असे सायझिंग धारकांचे मत असून अशा नोटीसा मागे घेऊन वीजपुरवठा खंडित केलेल्या सायझिंग धारकांना रिस्टार्ट चा आदेश दिल्याशिवाय सायझिंग धारकांचा संप मागे घेण्यात येणार नसल्याच्या भूमिकेवर सायझिंग असोसिएशन ठाम आहे.

गुगल पे, फोन पे, पेटीएम वरून 45 दिवसांसाठी बिनव्याजी उधार पैसे मिळवा, वाचा सविस्तर (UPI Now pay later)

शुक्रवारपासून सदर आंदोलनास सुरुवात झाली आहे सदरचे आंदोलन असेच लांबले गेले तर वस्त्रउद्योगाचे नुकसान होणार असून सध्या इचलकरंजी शहरांमध्ये दीडशे सायझिंग सुरू आहेत यामध्ये प्रतिदिन आठ लाख सत्तर हजार किलो सुतावर प्रक्रिया केली जात आहे.

बजाज फायनान्स: 50 हजार रुपये Personal loan मिळवा! परतफेड ८ वर्षात करा !

त्याची किंमत सरासरी २६ कोटी रुपयाचे सुत लागते यापोटी सायझिंग धारकांना दोन कोटी 18 लाखा रूपयाची मजुरी मिळत असते सदर प्रक्रिया केलेल्या सुतापासून लाखो मीटरचे कापड बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते तसेच सुमारे बारा ते पंधरा हजार यंत्रमाग प्रतिदिन या सायझिंग उद्योगावर अवलंबून आहेत.

आंदोलनादरम्यान दिवसागणिक शहरातील आठ ते दहा हजार यंत्रमागावरील कापड उत्पादन ठप्प होणार आहे यात वस्त्रोंद्योगाचे कोट्यावधीच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींवर वर्षभर राहणार शनिदेवाची कृपा? मिळू शकते प्रचंड श्रीमंत होण्याची संधी

आंदोलन जसजसे वाढत जाईल तसतसे शहरातील वस्त्रोद्योग टप्प्याटप्प्याने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने याबाबत निर्णय घेऊन कायदेशीर बाबीची तपासणी करत सदरचे सायझिंग उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत शहरातील वस्त्रोद्योगातील जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या वतीने शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -