वैदिक ज्योतिष्य शास्त्रात प्रत्येक ग्रह महत्त्वाचा मानला जातो. देवतांचा गुरू बृहस्पति नवग्रहात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु सध्या स्वतःच्या राशीत म्हणजेच मेष राशीमध्ये मार्गी झाले आहेत. ३१ डिसेंबर २०२३ रोजी गुरू मेष राशीमध्ये मार्गी झालेत.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच देवगुरु गुरू वृषभ राशीत प्रवेश करतील. ऑक्टोबर महिन्यात देवगुरु वक्री होणार आहेत. देवगुरु मार्गी स्थितीमुळे काही राशीचं भाग्य उजळू शकतं, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं आणि आर्थिक लाभही मिळू शकतो. आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा?
सिंह राशी
गुरु मार्गस्थ असल्याने सिंह राशीच्या लोकांना केवळ लाभच लाभ मिळू शकतो. या काळात पैशाशी संबंधित समस्या संपूष्टात येऊ शकतात. या काळात तुम्ही तुमचं बँक बॅलन्स वाढवण्यात यशस्वी होऊ शकता. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. या काळात मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. कौटुंबिक जीवन देखील चांगले राहण्याची शक्यता आहे.
कर्क राशी
गुरुच्या मार्गी स्थितीमुळे कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरी करणार्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना गुरु मार्गस्थ असल्याने प्रचंड लाभ मिळू शकतो. यावेळी करिअरमध्ये यश मिळू शकते. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो.