Monday, January 13, 2025
Homeक्रीडाराजस्थानचा स्थानिक क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

राजस्थानचा स्थानिक क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीचा थरार सुरु आहे. एका बाजूला मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात फायनलसाठी रस्सीखेच पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात चढाओढ सुरु आहे. तर काही दिवसांनी 7 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

 

राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालंय. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं 7 रणजी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्याशिवाय रोहित 28 एकदिवसीय रणजी सामने आणि 4 टी 20 सामनेही खेळला होता. रोहितच्या नावाने जयपूरमध्ये आरएस अकादमीही होती. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या निधनाची अर्धवट माहिती व्हायरल झाली आहे, ज्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचं निधन झाल्याचा गैरसमज अनेक क्रिकेट चाहत्यांचा झालाय. मात्र निधन झालेला रोहित शर्मा हा राजस्थानचा आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा याची वयाच्या 40 व्या वर्षी प्राणज्योत माळवली. रोहित गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. अखेर शनिवारी 2 मार्च रोजी रोहितने जगाचा निरोप घेतला. रोहित राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांपैकी एक होता. रोहित आपल्यातून निघून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

रोहित शर्मा याच्याबाबत थोडक्यात

रोहित शर्मा याचा जन्म 7 नोव्हेंबर 1983 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. रोहितला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं. रोहितने क्रिकेटर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. रोहितने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्थान मिळवलं. रोहितने 7 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 53.54 च्या स्ट्राईक रेट आणि 12.76 अशा सरासरीने 166 धावा केल्या. तर 28 लिस्ट ए सामन्यांमध्ये 75.15 च्या स्ट्राईक रेट आणि 35.41 च्या सरासरीने 850 धावा केल्या. तसेच 4 टी 20 सामन्यांमध्ये रोहितने 135.05 स्ट्राईक रेट आणि 32.75 च्या सरासरीने आणि 131 धावा केल्या. तसेच रोहितने राजस्थानसाठी 7 विकेट्सही घेतल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -