Monday, December 23, 2024
Homeक्रीडाCSK साठी वाईट बातमी, एमएस धोनीच्या टीमला बसू शकतो मोठा झटका

CSK साठी वाईट बातमी, एमएस धोनीच्या टीमला बसू शकतो मोठा झटका

IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सचा कॅम्प सुरु झाला आहे. 17 व्या सीजनमध्ये पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी CSK च्या खेळाडूंनी तयारी सुरु केली आहे. या दरम्यान CSK साठी एक चांगली बातमी नाहीय. चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढू शकते. सीएसकेचा एक प्रमुख खेळाडू 17 व्या सीजनमधून बाहेर होऊ शकतो. दुखापत आणि सर्जरी हे बाहेर होण्यामागे कारण असू शकतं. IPL 2024 चा पूर्ण नाही, पण निम्मा सीजन कदाचित हा खेळाडू CSK टीममध्ये दिसणार नाही. IPL 2024 च्या सीजनमध्ये धोनी आणि सीएसकेला ज्या खेळाडूची कमतरता जाणवेल, त्याच नाव डेवन कॉनवे आहे.

डेवन कॉनवे CSK साठी डावाच्या सुरुवातीला पाया रचण्याच काम करतो. ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला येऊन धुवाधार बॅटिंग ही कॉनवेची ओळख आहे. आगामी आयपीएल सीजनमध्ये धोनीला ऋतुराजसोबत नवीन ओपनिंग पार्ट्नर शोधावा लागू शकतो. कदाचित डेवन कॉनवे या सीजनमध्ये खेळताना नाही दिसणार.

असं काय झालय की, नाही खेळणार

डेवन कॉनवेसोबत असं काय झालय की, ज्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये खेळताना नाही दिसणार?. याच कारण आहे, त्याच्या अंगठ्याला झालेली दुखापत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात डेवन कॉनवेच्या अंगठ्याच ऑपरेशन होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्याला ही दुखापत झाली होती.

रिकवरीसाठी किती वेळ लागणार?

वेगवेगळे स्कॅन आणि स्पेशलिस्ट डॉक्टरच्या सल्ल्यावरुन डेवन कॉनवेच्या अंगठ्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्जरीनंतर रिकवरीसाठी कमीत कमी 8 आठवडे म्हणजे दोन महिन्यांचा वेळ लागेल. याचा अर्थ IPL 2024 च्या निम्म्यापेक्षा जास्त सीजनला तो मुकू शकतो.

डेवन कॉनवे यंदाच्या सीजनमध्ये खेळणार नाही, या बद्दल अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इंजरी आणि सर्जरीनंतर रिकवरीला जो वेळ लागेल, त्या बद्दलचा हा आमचा अंदाज आहे. त्याच्या दुखापतीबद्दल समजल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वेलिंग्टन टेस्टमधून त्याला बाहेर ठेवण्यात आलं होतं. कॉनवे क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार, असं बोलल जात होतं. पण दुखापतीमुळे ते शक्य नाहीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -