Monday, December 23, 2024
Homeराशी-भविष्यराशिभविष्य : मंगळवार दि. 12 मार्च 2024

राशिभविष्य : मंगळवार दि. 12 मार्च 2024

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12 March 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळू शकते. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वजबाबदारी चोख पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. प्रगतीचे नवे मार्ग उघडतील.

वृषभ

आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्य चांगल राहील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे नाव काही रचनात्मक कार्यात असेल. प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही नवीन पावले उचलाल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. सकारात्मक विचारांचा तुम्हाला फायदा होईल.

मिथुन

खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळू शकते. आगामी काळात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढू शकतात. प्रत्येकजण तुमच्या बोलण्याने प्रभावित होऊ शकतो. तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या आवडीच्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. धार्मिक कार्यात रस घ्याल. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि व्यायाम केला पाहिजे.

कर्क

आजचा दिवस बरा असेल. कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवाल. एखादा निर्णय घेणं कठीण ठरू शकतं. पैसा एखाद्या अडकून राहू शकतो. ऑफीसमध्ये जास्त काम येऊ शकतं. एखाद्या कामात, अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते.

सिंह

आजचा दिवस संमिश्र असेल. घरी एखाद्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते, त्यामुळे वातावरण बदलू शकते. कोणताही वाद टाळावा. कोणत्याही व्यक्तीशी बोलत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. या राशीच्या अभियंत्यांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. मेहनतीच्या जोरावर कामात यश मिळेल.

कन्या

आज तुम्हाला अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळाल. तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमचे कामाचे नियोजन यशस्वी होईल. आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उंचावण्यासाठी चांगला आहे. तसेच, आजच्या दिवशी कमी मेहनतीमध्ये चांगले फळ मिळेल. अनेक दिवसांपासून कार्यालयात प्रलंबित असलेली कामे तुम्ही सहज पूर्ण कराल.

तूळ

आजचा दिवस सामान्य राहील. कोणतंही काम करताना मन शांत ठेवा, यामुळे तुमचे काम सहज पूर्ण होईल. पैशाशी संबंधित मोठे निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्यावेत. काही जुन्या प्रकरणामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनुभवी व्यक्तीचाच सल्ला घ्यावा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज नवीन गुंतवणूकदार मिळू शकतो.

वृश्चिक

आजचा दिवस उत्तम जाईल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस चांगला जाईल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक क्षेत्रात स्थिरता राहील. मित्रांसोबत काही आनंदाचे क्षण घालवू शकाल. अचानक कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे. जे मीडिया क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्या कामाचे आज कौतुक केले जाऊ शकते.

धनु

आजचा दिवस चांगला जाईल. एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. घरातील कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी वडीलधाऱ्यांचे मत तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. थोड्या मेहनतीने तुम्हाला काही मोठ्या आर्थिक लाभाची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज मोठ्या कंपनीत नोकरी मिळू शकते. महिलांना गृहउद्योग सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला जाईल.

मकर

आज तुमचा दिवस ठीक जाईल. तुम्ही तुमचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करू शकता. काही कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या समस्या थोड्या वाढू शकतात. पैशाची चिंता देखील तुम्हाला थोडं सतावू शकते. ऑफिसमधील काही लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांनी आज अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. तुमचा प्रवास फायदेशीर ठरेल

कुंभ

ऑफिसमधील वरिष्ठ तुमचे काम पाहून आनंदित होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आई-वडील तुम्हाला मोठी भेट देऊ शकतात. तुम्ही खूप आनंदी व्हाल. तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही काही नवीन तंत्रज्ञान शिकण्याचाही प्रयत्न करू शकता.

मीन

आज तुम्ही तुमचा दिवस जास्त प्रवासात घालवू शकता. कुटुंबासोबत मौजमजेसाठी दूर कुठेतरी सहलीला जाण्याची योजना आखू शकता. या राशीच्या व्यावसायिकांना अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. आर्थिक स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. सोसायटीतील लोक तुम्हाला घरी भेटायला येऊ शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -