मुकेश अंबानी यांच्या जिओचा भारतीय दूरसंचार बाजारात एकहाती सत्ता आहे. इतर कंपन्या बाजारात असल्या तरी जिओचा दबदबा आहे. जिओने अनेक वर्षांपासून अनेक प्रयोग करत तिचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पण लवकरच या साम्राज्याला सुरुंग लागू शकतो. गौतम अदानी सुद्धा इंटरनेट मार्केटमध्ये उडी घेऊ शकतात.
भारतात स्पेक्ट्रमचा लिलाव 20 मेपासून सुरु होत आहे. DoT ने त्यसाठी 8 मार्च रोजी नोटीस पण बजावली आहे. यापूर्वी पण अदानी या बाजारात उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त येऊन धडकले होते. आता घोडा आणि मैदान यांच्यात फारसं अंतर उरले नाही. त्यामुळे अदानी त्यांचे कार्ड चालविणार का, हे समोर येईल.फास्ट इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये एंट्री
अदानी समूहाचे चेअरपर्सन गौतम अदानी यांनी एका बैठकीत स्पेक्ट्रम लिलावात सहभागी होण्याबाबत एक हिंट दिली होती. त्यांनी त्याचवेळी अदानी समूह लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गौतम अदानी 5G इंटरनेट सेवा क्षेत्रात मोठा वाटा खरेदी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वाधिक बोली कोण लावतं यावर पण पुढील प्रक्रिया होईल. पण यामुळे अदानी समूह थेट फास्ट इंटरनेट सेवा प्रक्रियेत एंट्री घेणार हे नक्की.यापूर्वी पण दिले होते संकेत
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी कंपनी बैठकीत याविषयी कर्मचाऱ्यांना संकेत दिले होते. इंटरनेट सेवा उद्योगात उतरण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता. याशिवाय अदानी AI-ML आणि इंडस्ट्रियल क्लाउड कॅपेबिलिटीवर पण काम करणार आहेत. त्याच दरम्यान त्यांचा इंटरनेट सेवा क्षेत्रात पण उतरण्याचा मनसूबा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी क्वालकॉमच्या सीईओंची भेट घेतल्याने या चर्चांना ऊत आला. या शक्यतांवर जणू शिक्कामोर्तब झाले.अधिकृत वक्तव्य नाही
गौतम अदानी यांनी क्वालकॉमच्या सीईओंच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पण अपलोड केले होते. अर्थात त्यांनी त्यावेळी याविषयी कोणतीही टिप्पणी अथवा भेटीचा तपशील दिला नव्हता. पण अनेक वृत्तांमध्ये अदानी समूह हा इंटरनेट सेवा बाजारात दाखल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अर्थात कंपनीकडून अजून याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे गौतम अदानी या बाजारात उतरुन ग्राहकांना मोफत इंटरनेट सेवेचे आमिष दाखवत त्यांच्याकडे ओढण्याची शक्यता पण वर्तविण्यात येत आहे. अर्थात सध्या तरी या जर-तरच्या गोष्टी आहेत. येत्या दोन महिन्यात याविषयीचे सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा तज्ज्ञ करत आहेत.