IPL 2024 SRH vs MI Live Streaming : मुंबईला हैदराबाद विरुद्ध विजयी हॅटट्रिकची संधी, सामना कधी आणि कुठे?
हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी सज्ज झाले आहेत.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 7 सामन्यांचं आयोजन हे यशस्वीपणे करण्यात आलं आहे. आता या हंगमातील आठवा सामना हा हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघांचा हा या सिजनमधील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची सुरुवात ही पराभवाने झाली. त्यामुळे दोन्ही संघांचा दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर मात करुन विजयी खातं उघडण्याचं प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये या सामन्यात चढाओढ पाहायला मिळू शकते. मुंबईच्या नेतृ्त्वाची जबाबदारी ही हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादची धुरा सांभाळणार आहे.
हैदरबाद आणि मुंबई आयपीएलमध्ये एकूण 21 वेळा आमनेसामने भिडले आहेत. मुंबई यामध्ये वरचढ राहिली आहे. मुंबईने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 9 वेळा विजय मिळवला आहे. तसेच मुंबईने गेल्या 2 सामन्यांमध्ये हैदराबादवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या सामना जिंकून मुंबईला विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. हा सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
हैदरबाद विरुद्ध मुंबई सामना केव्हा?
हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना बुधवारी 27 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना कुठे?
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात अंपायर, थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी कोण?
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात केएल अनंथा पद्मनाभन आणि उल्हास गंधे हे दोघे फिल्ड अंपायर असणार आहेत. कुमार धर्मसेना थर्ड अंपायर असणार आहे. तर प्रकाश भट मॅच रेफरी आहेत.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन फिलिप्स. वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, फजलहक फारुकी, उमरान मलिक, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, आकाश महाराज सिंग आणि नितीश रेड्डी.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, नमन धीर, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मढवाल, नुवान तुषारा आणि क्वेना मफाका.