Saturday, February 8, 2025
Homeक्रीडाकोलकाता विजयानंतर प्लेऑफच्या आणखी जवळ, मुंबईचं पॅकअप

कोलकाता विजयानंतर प्लेऑफच्या आणखी जवळ, मुंबईचं पॅकअप

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी धुव्वा उडवला. कोलकाताचा हा मुंबई विरुद्धचा वानखेडे स्टेडियममधील दुसरा विजय ठरला. केकेआरने वानखेडे स्टेडियममध्ये तब्बल 12 वर्षांनंतर विजय मिळवला. केकेआरने मुंबईला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईचे फलंदाज या आव्हानाचं पाठलाग करताना अपयशी ठरले. कोलकाताच्या गोलंदाजांनी धारदार बॉलिंगने पलटणला 18.5 ओव्हरमध्ये 145 धावांवर ऑलआऊट केलं. कोलकाताचा हा या हंगामातील 7 वा विजय ठरला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? हे जाणून घेण्याआधी मुंबईकडून कुणी किती धावा केल्या हे जाणून घेऊयात.

मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 35 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिड याने 24 धावांचं योगदान दिलं. ईशान किशन 13, रोहित शर्मा आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 11-11 धावा केल्या. चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पीयूष चावला आला तसाच गेला. तर जसप्रीत बुमराह 1 रनवर नाबाद राहिला. तर केकेआरकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. केकेआरने विजयासह दुसरं स्थान आणखी भक्कम केलंय. तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानी कायम आहे. तर राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. राजस्थान नेट रनरेट हा +0.622 असा आहे.

कोण मिळवणार प्लेऑफचं तिकीट?

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.

 

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -