इचलकरंजी
सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांश कराओके गीत संगीत व शाहिरी संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कराओके गीत गायन स्पर्धेत सौ. अश्विनी अभयकुमार पोतदार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर मुकुंद गणपती चौगुले आणि साजिद मतवाल यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी शहर व परिसरातील कलाकारांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाजवादी प्रबोधिनी येथे संपन्न या स्पर्धेत 60 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक प्रताप जाधव, परिक्षक सौ. गौरी पाटील, मनीष आपटे, किशोर धनवडे, अभयकुमार पोतदार आणि शाहीर संजय जाधव आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सर्व मान्यवर व परिक्षकांचे स्वागत प्रताप जाधव, सौ. संगीता कसलकर, प्रवीण केसरकर, सचिन चौधरी, यांनी केले.
स्पर्धेत कु. मानसी घोरपडे, शफिक मुल्ला, दगडू कांबळे, विवेक कुंभार, केतकी पाटील, सौ. स्वाती सुतार आणि कु. अपूर्वा जावळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सर्टीफिकेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहूल आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अमितकुमार खोत, चंद्रकांत मांगलेकर, बाबासाहेब कोरवी, सचिन चौधरी, प्रवीण केसरकर, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. अमोल बुल्ले यांनी साऊंड व्यवस्था नेटकेपणाने सांभाळली. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गाणी गात श्रोत्यांना खिळवून ठेवले. तर सीमा मुळे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने स्पर्धेत रंगत आणली.