Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रपतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली घरी परतताना महिलेवर अत्याचार

पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली घरी परतताना महिलेवर अत्याचार

हैदराबादच्या लोथकुंटा परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. (registrant)१३ जुलै रोजी सकाळी, २९ वर्षीय महिला, जी आपल्या पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी अलवल पोलीस ठाण्यात गेली होती, तिच्यावर कथित सामूहिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी संध्याकाळी ही महिला आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी अलवल पोलीस ठाण्यात गेली होती. तिने उबर मार्फत रिक्षा बुक केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर महिला स्टेशनजवळ थांबली होती. तेव्हा एक रिक्षाचालक तिच्या जवळ आला आणि कुठे जायचं आहे, विचारून महिलेला रिक्षात बसण्यास सांगितले.

 

एफआयआरनुसार, महिला रिक्षात बसल्यानंतर(registrant) रिक्षाचालकाने रिक्षा एका वाईन शॉपजवळ थांबवली, जिथे त्याचे दोन साथीदार रिक्षात बसले. हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिलेला जबरदस्ती करत दारू पिण्यास भाग पाडले.

 

यानंतर रिक्षाचालक रिक्षा अलवल येथील व्यंकटराव लेनवरील निर्जन भागात घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर या तिघांनी महिलेला धमकावले आणि रिक्षात सामूहिक अत्याचार केला. शनिवारी पहाटे २:४५ च्या सुमारास पीडितेने तेथून कसाबसा पळ काढला आणि गणेश मंदिरात पोहोचली, जिथे तिने स्थानिक लोकांकडे मदत मागितली. महिलेने डायल १०० सेवा वापरून पोलिसांना फोन केला आणि बोलाराम पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात नेले.

 

 

महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी (registrant)रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे, तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -