येथील बँक ऑफ बडोदा इचलकरंजी शाखेमध्ये बँकेचा ११७ वा वर्धापन दिन ग्राहक आणि बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू ताशीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांची उपस्थीती होती. प्रारंभी सयाजीराव गायकवाड तिसरे महाराजा यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवराच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक ताशीलदार यांनी, बडोदा बँकेतील विविध उपक्रमाबद्दल अभिनंदन कताना इचलकरंजी शाखेच्या अविरत व तत्पर सेवेचे कौतुक केले. तसेच आर्थिक फसवणूकिबाबत बँक कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले.
बँकेचे मॅनेजर अविनाश मुळीक यांनी बँकेतील चालू योजनांची माहिती दिली.उपस्थित ग्राहकांनी आपले बँकेबद्धलचे अनुभव, मिळणारी सेवा याबद्दल कौतुक केले. यावेळी बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.




