Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीनदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी

नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे रविवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यनिमित्ताने सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक सेवा करण्यात आल्या.

पहाटे सहा वाजता इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सौ व श्री ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची शोडशोपचारिक पूजा करून अभिषेक करण्यात आला, सकाळी आठ वाजता आमदार प्रकाश आवाडे माजी नगराध्यक्ष्या किशोरी आवाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली, तर सकाळी साडेदहा वाजताची नैवेद्य आरती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सौ व श्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवा केंद्र परिसरात करण्यात आलेल्या काँक्रीटीकरण, हाय मास्ट लॅम्प, आणि शुद्ध पेयजल प्रकल्प आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार्‍या गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी 8 वाजता उत्सवाला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकर्‍यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्विकारण्याची विनंती केली.

त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली. हजारो भाविक सेवेकर्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि मानवीय समस्येवर ईश्‍वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -