Thursday, November 21, 2024
Homeजरा हटकेपालकची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा अर्धी जुडी पालकच्या खमंग, कुरकुरीत वड्या;...

पालकची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा अर्धी जुडी पालकच्या खमंग, कुरकुरीत वड्या; रेसिपी लगेच लिहून घ्या

आपल्या सगळ्यांनाच डॉक्टर नेहमी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण, नेहमीच पालकची भाजी काय खायची असा प्रश्न अनेकांना पडतो. आई अनेकदा यात वेगळं काही तरी करायचं म्हणून पालक पनीर, पालक भजी, पालकचे पराठे, पालक पुरी आदी पदार्थ बनवत असते. तर आज आपण कोथिंबीर वडी प्रमाणे पालकची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर पालकची वडी बनवण्यासाठी काय साहित्य व कृती लागेल हे लगेच जाणून घेऊ या .

 

साहित्य :

 

१. अर्धी जुडी पालक२. एक कप बेसन३. तांदळाचे पीठ १/२ चमचा४. सफेद तीळ १/२ चमचा५. एक चमचा जिरे पावडर६. धणे पावडर १/२ चमचा७. हळद १/२ चमचा८. एक चमचा लाल मसाला९. एक चमचा लसूण मिरची पेस्ट१०. एक कप११. २ चमचे गुळ व चिंचेचा कोळ१२. चिमुटभर ओवा१३. तेल१४. मीठ

कृती :

 

१. सगळ्यात पहिला अर्धी जुडी पालक बारीक चिरून घ्या.२. त्यानंतर एका भांड्यात चिरलेला पालक, तांदळाचे पीठ, बेसन घाला.३. नंतर त्यात मीठ, हळद, धणे, जिरे पूड, लाल तिखट, ओवा, लसूण, मिरची पेस्ट, सफेद तीळ, कोथिंबीर, गुळ आणि चिंचेचा कोळ घाला.४. त्यात १/२ कप पाणी घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.५. नंतर हातावर तेलाचे एक-दोन थेंब घ्या आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि रोल करून घ्या.६. स्टीमर घ्या, त्याला थोडं तेल लावा.७. त्यात तयार केलेलं मिश्रण उकडवण्यासाठी १० ते १५ मिनिटे ठेवा.८. त्यानंतर रोल थोडा वेळ थंड होऊ द्या.९. सुरीला तेल लावा आणि मग वड्या कापून घ्या.१०. अशाप्रकारे तुमची पालक वडी तयार.

 

ही रेसिपी @me_haay_foodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

 

पालकची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

पालकच्या भाजीमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आढळून येते. तसेच यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण व वजन देखील नियंत्रित राहते. पालक खाण्याचे फायदे हे केवळ लठ्ठपणावर मात करण्यापूरतेच मर्यादित नसून पालकच्या नियमित सेवनामुळं व्यक्तीची दृष्टी सुधारते. दिवसरात्र लॅपटॉप, पीसीवर काम करणाऱ्यांसाठी पालकची भाजी किंवा त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ बेस्ट पर्याय ठरतील. त्यामुळे तुम्ही देखील पालक वडी हा पदार्थ बनवा आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -