शनिवारी पासून राज्यात अनेक भागात संततधार सुरु असून आज रविवारी दमदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच फार गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
विदर्भातील अकोला,अमरावती, बुलढाणा, नागपूर,चंद्रपूर वाशिम, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडेल अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या चार जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील 4 दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहिल, असं हवामानतज्ञ के. एस होसळीकर यांनी म्हटलं आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासात मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड, लातूर,परभणी, धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडेल, असं अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.