भारताचा स्वातंत्र्यदिन आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यावर्षी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. हा दैवस साजरा करण्यासाठी आता संपूर्ण देश आता सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र 15 ऑगस्टचा उत्साह पाहायला मिळत आहे.
याच दिवशी भारताची ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका झाली होती. जिथे भारताच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यतेचा आवाज घुमत आहे तिथेच एक असेही राज्य आहे, जिथे आजकाल शांततेचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे या राज्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही.
होय, हे खरे आहे की, भारतात एक असेही राज्य आहे जिथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. या राज्याचे नाव आहे गोवा. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल कारण गोवा हे भारताचे एक प्रमुख ठिकाण आहे. या जागी दरवर्षी हजारो पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. भारतातील सुंदर ठिकाणांपैकी हे एक आहे. मात्र गोव्यात स्वातंत्र्य दिन कधीच साजरा झाला नाही. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यदिन का साजरा करता येत नाही, हे या लेखाद्वारे जाणून घेऊयात.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामतीतून स्वतंत्र झाला हे आपणा सर्वांना माहीत आहे. या दिवशी संपूर्ण देश आनंदात असताना गोव्यात मात्र निराशेचे ढग होते. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. याच कारणामुळे गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात नाही.
पोर्तुगीजांनी गोव्यावर अवघे 400 वर्षे राज्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यांनतर 14 वर्षांनी 1961 मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य झाला. याच कारणामुळे या जागी आजही 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन मानला जात नाही आणि साजरा केला जात नाही.