Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगस्वातंत्र्य दिनी सोने-चांदीचा भाव किती? गेल्या वर्षीच्या तुलनेत इतका वधारला भाव, किंमती...

स्वातंत्र्य दिनी सोने-चांदीचा भाव किती? गेल्या वर्षीच्या तुलनेत इतका वधारला भाव, किंमती जाणून घ्या

आज 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. सकाळपासूनच रस्त्यांवर, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयासमोर देशभक्तीचा महापूर पाहायला मिळत आहे. या राष्ट्रीय सणाला सोने-चांदीची खरेदी करणे हे पण शुभ मानल्या जाते. अशा ग्राहकांना या मौल्यवान धातूंनी मोठा दिलासा दिला. या मंगल दिनाच्या पूर्वसंध्येला दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. पण गेल्या स्वातंत्र्य दिनी या दोन्ही धातूंचा जो भाव होता, त्यापेक्षा किंमती इतक्या वधारल्या आहेत.आता काय आहेत बेशकिंमती धातूचा दर?

 

किंमतीत इतका पडला फरक

 

गेल्या स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्ट 2023 रोजी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर यावेळी ता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. म्हणजे 22 कॅरेट सोने 10,900 रुपयांनी वाढले आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 11,900 रुपयांनी वधारला आहे. गेल्या स्वातंत्र्य दिनी, गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये होता. तर या स्वातंत्र्य दिनी हा भाव एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे. म्हणजे किलोमागे चांदी 10,200 रुपयांनी महागली आहे.

 

सोने झाले स्वस्त

 

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. पहिल्या दिवशी सोमवारी सोने 270 रुपयांनी तर 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी सोने महागले. 14 ऑगस्ट रोजी त्यात 110 रुपयांची घसरण झाली. सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूत घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीत चढउताराचे सत्र

 

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 4200 रुपयांनी स्वस्त झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत चढउताराचे सत्र आहे. 12 ऑगस्ट रोजी चांदी किलोमागे 600 रुपयांनी स्वस्त झाली. 13 ऑगस्टला 1 हजार रुपयांनी चांदी महागली. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,921 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -