ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंचगंगा नदीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नदी फेसाळत आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्यात फेस आल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
पंचगंगेच्या पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन वेगवेगळे उपाय करत आहे, पाणी प्रदूषणाची मात्रा कमी होताना दिसत नाही. नदी प्रदूषणात सतत वाढ होत आहे, बुधवारी रात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने पंचगंगा दुथडी भरून वाहत आहे.
राजाराम बंधाऱ्याच्या दक्षिणेला दुथडी भरुन वाहणारी पंचगंगा तर उत्तरेला फेसाळणारे पाणी अशी काहीशी विचित्र स्थिती गुरुवारी दिवसभर राजाराम बंधारा परिसरात पाहायला मिळाली.प्रदूषणामुळेच पंचगंगा नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा फेसाळली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -