Thursday, October 3, 2024
Homeसांगलीद्राक्ष, ऊस, डाळिंब, भाज्यांची पिके झाली भुईसपाट; बळीराजा पुन्हा संकटात

द्राक्ष, ऊस, डाळिंब, भाज्यांची पिके झाली भुईसपाट; बळीराजा पुन्हा संकटात

सांगलीसह कडेगाव, मिरज, वाळवा, शिराळा, आटपाडी, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ अशा सर्वंच तालुक्यांत बुधवारी व गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेती, घरे, व्यवसाय अशा सर्वंच क्षेत्रांतील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील बहुसंख्य भागात ढगाळ वातावरण होते. बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. शेतात पाणी साचले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊसतोडी बंद झाल्या आहेत. तोडलेला ऊस आणि उसाने भरलेली वाहने शेतात अडकून पडली आहेत. दिवसभर वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकर्‍यांची खटाटोप सुरू होती. ऊसतोड मजुरांच्या खोपटीत पाणी शिरल्याने त्यांच्या निवार्‍याचे वांदे झाले आहेत.

जोरदार वार्‍याच्या तडाख्याने उभे पिके आडवी झाली आहेत. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला अशा सर्वच पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. घातलेला खर्चही निघणार की नाही, अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -