मुलांना नेहमी वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. चिप्स, मॅगी, पिझ्झा, चॉकलेट असे पदार्थ खाण्याची मागणी करतात. पण बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरतात. अशावेळी काय बनवावं? असा प्रश्न महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही ब्रेडपासून हा नवा पदार्थ बनवू शकता.
ब्रेडची स्वीट डिश बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
८-९ ब्रेड स्लाइस
२ कप साखर
१ कप पाणी
१ चमचा वेलची पावडर
तूप आवश्यकतेनुसार
ब्रेडची स्वीट डिश बनवण्याची कृती:
सर्वात आधी ब्रेड एका स्लाइसमध्ये कट करुन घ्या.
त्यानंतर एका पॅनमध्ये तूप घालून ब्रेड परतून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये पाणी आणि साखर घालून या पाण्याला उकळी येऊ द्या.
आता वेलची पावडर घालून पाक तयार करा.
त्यानंतर गरम साखरेच्या पाकात ब्रेड स्लाइस डीप करुन ठेवा.
आता ब्रेडची स्वीट डिश सर्व्ह करा.