कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा पाचवा भाऊचा धक्का पार पडला. शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. घरातील काही सदस्यांच कौतुक केल तर काही सदस्यांना चांगलेच खडेबोल सुनावले .
पण कालचा भाऊचा धक्का प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊया.
घरात झालेल्या भांडणामध्ये सगळ्यांनी अरबाजची बाजू घेतली आणि निक्की-अभिजीत विरुद्ध घर असं चित्र काल पाहायला मिळालं. अभिजीत-निक्कीच्या मैत्रीवर सुद्धा अरबाजने संशय घेतला आणि अंकिता, आर्याला त्यांच्याविरुद्ध भडकवलं. त्यामुळे काल अरबाज, आर्या आणि अंकिता यांची रितेश भाऊंनी चांगलीच शाळा घेतली. त्यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली तर निक्की आणि अभिजीतच्या खेळाचं कौतुक केलं.
रितेशने इतर सगळ्या सदस्यांना निक्कीची बाजू घेऊन ओरडल्याने प्रेक्षक चांगलेच संतापले. निक्की आतापर्यंत वाईटच खेळत आली आहे त्यामुळे तिचं कौतुक करण्याची गरज नव्हती तर अभिजीत डबल ढोलकी आहे असं म्हणत अनेक प्रेक्षकांनी भाऊच्या धक्क्यावर उघड नाराजी व्यक्त केली.
तर काहींनी घनश्यामची रितेशने बाजू घेतली यावरूनही त्याला सुनावलं. तर अनेकांनी कलर्स वाहिनी आणि बिग बॉस मराठीचे मेकर्स निक्कीलाच चांगलं दाखवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून करत आहेत असा दावा केला.
“तुम्ही फक्त निक्कीला प्रमोट करण्यासाठी हा सिझन केलाय” अशी टीका एकाने केली तर एकाने “Actually हे निक्कीला विरोध करतच नव्हते हे अरबाजला सपोर्ट करत होते… झापा अजून झापा ” असं म्हणत रितेशला सपोर्ट केला. “उगाच निक्की पुराण ऐकायला १.३० वाया जातात उद्या चा भाऊ चा धक्का नाही बघणार ” अशी कमेंट एकाने केली तर एकाने “लोकांच्या नजरेत निक्की ची चांगली image बनवण्यासाठी ‘बिग बॉस खूप मना पासून पर्यत करत आहे ” असंही एकाने म्हंटलं. तर एकाने “निक्कीलाच बिग बॉसची ट्रॉफी देऊन टाका” अशी टीका केली आहे.
एकूणच शोमध्ये निक्कीचं कौतुक झाल्याने आणि इतर सदस्यांना ओरडा पडल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. प्रेक्षकांच्या नाराजी मुळे मेकर्स आता काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.








