Friday, March 14, 2025
Homeइचलकरंजीकल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेमध्ये आकर्षक व्याज दराची ‘गणेश वंदना’ ठेव योजना...

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेमध्ये आकर्षक व्याज दराची ‘गणेश वंदना’ ठेव योजना कार्यान्वित

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेमध्ये आकर्षक व्याज दराची ‘गणेश वंदना’ ठेव योजना कार्यान्वित

इचलकरंजी ता.ः आपले आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनार्थ व श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने २१ महिन्यासाठी ८.१५% व्याज दराची ‘गणेश वंदना ठेव योजना’ या आकर्षक ठेव योजनेचा शुभारंभ केला आहे.सदर ठेव योजनेमध्ये ठेवीदार कमीत कमी रु. १००० पासून व त्यावरील कितीही रक्कमेपर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. या ठेवीसाठी बँकेने रु. १ कोटीपर्यंत प्रतिवर्ष ८.१५% व ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष ८.६५% इतका व्याज देणेचे निश्चित केले आहे. तसेच रु. १ कोटीच्या वर ८.२५% व ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष ८.७५% व्याज दिला जाईल. या ठेवीसाठीचा कालावधी हा केवळ २१ महिने इतका असणार आहे. या ठेवीसाठी मासिक, तिमाही किंवा पुनर्गुतवणूकीचा पर्याय खुला राहणार असून, या ठेवीसाठी बँक देत असलेल्या अन्य सुविधा लागू राहतील.

सदरची आकर्षक व्याज दराची ठेव योजना ही केवळ मर्यादीत कालावधीसाठी असल्यामुळे, सर्व ठेवीदारांनी व ग्राहकांनी या ठेव योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी या प्रसंगी केले.

सदर प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन सीए श्री संजयकुमार अनिगोळ, सीए श्री चंद्रकांत चौगुले (चेअरमन-BOM) तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -