यामध्ये बिग बॉसच्या घरातील नव्या कॅप्टनचं नाव समोर आलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात गुलिगत किंग सूरज चव्हाण नवीन कॅप्टन बनला आहे. आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
गुलिगत किंग सूरज चव्हाण बिग बॉसचा नवा कॅप्टन
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमो आऊट झाला असून यामध्ये कॅप्टन्सी कार्याची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे.
झापूक-झुपूक खेळी करत मारली बाजी
नवीन प्रोमोनुसार, झापूक झूपूकचे ब्रँड अॅम्बेसेडर, गोलिगत आहे ज्यांचं जिगर, सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरजभाऊ चव्हाण झाले आहेत कॅप्टन. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य ‘हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो’, अशा घोषणा देताना दिसत आहे.
‘झापुक झुपुक’ कॅप्टन सूरज