Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रकोयना धरणातून 50 हजार 442 क्युसेक्स विसर्ग

कोयना धरणातून 50 हजार 442 क्युसेक्स विसर्ग

सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाचे गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सहा वक्र दरवाजे ५ फूट ६ इंच फुटांपर्यंत उघडून धरणातून ५० हजार ४४२ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

 

सद्या कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ५२ हजार ५४२ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

 

कोयना पाणलोट क्षेत्रातही मंगळवारपासून पावसाचा जोर वाढ वाढल्याने बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच १०० टक्के धरण भरले आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतही दमदार पाऊस झाला आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही मोठी धरणे भरल्यातच जमा आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -