Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रआणखी एका आयपीओमुळे गुंतवणूकदारांचे खिसे फुल्ल! सूचिबद्ध होताच दिले दमदार रिटर्न्स!

आणखी एका आयपीओमुळे गुंतवणूकदारांचे खिसे फुल्ल! सूचिबद्ध होताच दिले दमदार रिटर्न्स!

बजाज हाऊसिंग फायानान्स (Bajaj Haousing Finance IPO) या आयपीओने गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आयपीओ मार्केटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच आयपीओंना मिळणारा प्रतिसाद पाहता अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी आयपपीओ घेऊन येत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सनंतर आथा NBFC बँकिंग कंपनी नॉर्थर्न आर्क कॅपिटल (Northern Arc Capital) या कंपनीने आपला आयपीओ आणला होता. हा आयपीओ आज (24 सप्टेंबर) शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला आहे. दरम्यान, सूचिबद्ध होताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. हा शेअर 33.7 टक्क्यांच्या प्रिमियमवर शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला आहे.

 

आयपीओ 33.7% च्या प्रिमियमवर लिस्ट

सोमवारी म्हणजेच 24 सप्टेंबर या एका दिवशी एकूण तीन आयपीओ शेअर बजारावर सूचिबद्ध झाले आहेत. यात नॉर्थर्न आर्क कॅपिटल या आयपीओचाही समावेश आहे. नॉर्थर्न आर्क कॅपिटल या आपयीओला गुंतवणूकदारांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ 110.71 पट सबस्क्राईब झाला होता. त्यानंतर आता हा आयपीओ 33.7% च्या प्रिमियमवर लिस्ट झाला आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 249-263 रुपये प्रति शेअर होता. या किमतीच्या तुलनेत कंपनीचा शेअर BSE वर 351 रुपयांवर सूचिबद्ध झाला आहे.

 

आयपीओ 142.28 पट सबस्क्राईब

बीएसईवर उपलब्ध असलेल्या आकडेवारूनुसार संस्थात्मक गुंतवणूकदार (क्यूआयबी) या श्रेणीत नॉर्थर्न आर्क कॅपिटल हा आयपीओ 240.79 पट सबस्क्राईब करण्यात आला होता. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदार या श्रेणीत हा आयपीओ 142.28 पट सबस्क्राईब करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत हा शेअर 30.74 पट सबस्क्राईब करण्यात आला होता.

 

एकूण 500 कोटी नवे शेअर्स जारी केले

नॉर्थर्न आर्क कॅपिटल या कंपनीने आपयीओच्या माध्यमातून 229 कोटी रुपये जमा केले आहेत. या आयपीओच्या माध्यमातून नॉर्थर्न आर्क कॅपिटल या कंपनीने एकूण 500 कोटी नवे शेअर्स जारी केले आहेत. या पैशांतून कंपनी आर्थिक गरजा पूर्ण करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -