शहरांमध्ये पाणी येण्याची ठराविक वेळ ठरलेली असते. अनेक वेळा या लोकांना अत्यंत काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा लागतो. कारण कधी कधी पाणीपुरवठा हा बंद केला जातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरेल असेच पाणी त्यांना वापरावे लागते. अशातच आता मुंबईमधील काही भागांमध्ये 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमधील करी रोड आणि त्या बाजूच्या परिसरात 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे आता महानगरपालिकेने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा असे सांगितलेले आहे. तसेच त्या परिसरात नागरिकांना आजच पाण्याचा पुरेसा साठा करावा, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.
पाणीपुरवठा बंद का होणार ? | Mumbai Water Supply
महानगरपालिकेच्या उत्तर विभागात सेनापती बापट रोडवर 1450 मिलिमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. आणि येथे 26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम चालू होणार आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. परंतु हे पाणी सगळ्या भागांमध्ये बंद राहणार नाही. तर काही भागांमध्ये बंद राहणार आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरवठा चांगल्या प्रमाणात करा आणि पाणी जपून काटकसरीने वापरा. अशी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
जी उत्तर
या भागातील सेनापती बापट रोड, वीर सावरकर रोड, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ रोड, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग या ठिकाणचा पाणीपुरवठा 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 33 टक्के बंद राहणार आहे.
जी दक्षिण | Mumbai Water Supply
यामध्ये सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव कालव मार्ग, लोवर डिझाईन मार्ग, बीडीडी चाळ यांचा पाणीपुरवठा 27 सप्टेंबर रोजी पहाटे 4 : 3p ते पावणे 8 या वेळेत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे एन एम जोशी मार्ग, बी.डी चाळ यांचा पाणीपुरवठा दुपारी अडीच ते तीन दरम्यान बंद राहणार आहे. .
मुंबईमधील अनेक जलवाहिना दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी कपात केली जाणार आहे. परंतु दुसरीकडे पुण्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुण्यातील खडकवासला धरण या क्षेत्रातील जवळपास चार धरणे पूर्णपणे भरलेली आहेत. त्यामुळे पुण्यात पाण्याची कसलीही कमतरता भासणार नाही. तसेच पुढील चार दिवस देखील हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या धरणांमध्ये पाणी क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच खडकवासला धरणातून मोठा नदीमध्ये विसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्याला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे.