Thursday, November 7, 2024
Homeब्रेकिंगजन्म,मृत्यू च्या नोंदणीसाठी केंद्र सरकार कडून CRS App लॉन्च; पहा कसं करतं...

जन्म,मृत्यू च्या नोंदणीसाठी केंद्र सरकार कडून CRS App लॉन्च; पहा कसं करतं काम?

अमित शाह यांनी याबद्दल X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ॲप जन्म आणि मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुलभ करेल, ज्यामुळे नागरिकांना कधीही, कुठेही आणि त्यांच्या राज्याच्या अधिकृत भाषेत नोंदणी करता येईल. “नोंदणीसाठी लागणारा वेळ कमी करेल.” असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पोस्ट सोबत भारताच्या रजिस्ट्रार जनरलचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ॲपचा इंटरफेस दाखवला आहे.

 

हे स्पष्ट करते की CRS मोबाइल ॲप डिजिटल प्रमाणपत्र वितरण आणि लेगसी रेकॉर्डचे ऑनलाइन डिजिटायझेशन सक्षम करते आणि ॲपच्या ऑपरेशन आणि देखभालसाठी राज्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही

CRS अ‍ॅप काम कसं करत?

 

Civil Registration System (CRS) mobile app आधी डाऊनलोड करावं लागणार आहे.

त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावं लागणार आहे.

अ‍ॅप त्यानंतर captcha पूर्ण करण्यास सांगणार आहे. त्यानंतर SMS द्वारा ओटीपी दिला जाईल. हा ओटीपी दिल्यानंतर लॉगिनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

CRS app च्या होम स्क्रीन वर जन्म मृत्यू नोंदणीची लिंक दिसेल.

जन्माच्या रजिस्ट्रेशन साठी “Birth” वर टॅप करा.

 

“Register Birth,” निवडा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. ज्यात बाळाची जन्म तारीख,पत्ता आणि कुटुंबियांची माहिती विचारली जाइल.

मृत्यू नोंदवण्यासाठी देखील “Death” > “Register Death” चा पर्याय निवडा.

नोंदणी सशुल्क असल्याने पेमेंट पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट तयार होईल.

CRS app वरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र डाऊनलोड करता येऊ शकतात.

डिजिटल गव्हर्नन्स चा विचार करून हे अ‍ॅप डिझाइन केलेले आहे. हे लेगसी रेकॉर्डचे डिजिटायझेशन देखील करते, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया पेपरलेस होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -