Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रव्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो

व्हॅनमध्ये तब्बल 6500 किलो चांदीच्या विटा, पोलिसांच्याही भुवया उंचावल्या; पाहा फोटो

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून 8 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 280 कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

 

राज्यातील विविध जिल्ह्यात, मतदारसंघात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करुन मौल्यवान वस्तू व रोकड जप्त करण्यात आली आहे.

 

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एक व्हॅन पोलिसांनी पकडले होते, त्यामध्ये दागिने व मौल्यवान वस्तू होत्या. त्यानंतर, आता मुंबईत चांदीच्या वीटांनी भरलेली व्हॅन पोलिसांनी पकडली आहे.

 

विकोळी पोलिस व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या वीटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत

 

व्हॅनमधील या चांदींच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे, या वीटा ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे.

 

पोलिसांना आढळलेल्या या वीटा अधिकृत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे.

 

दरम्यान, पोलिसांकडून सर्वच मतदारसंघात वाहनांवर व अवैध वाहतुकीवर करडी नजर असून अनाधिकृतपणे पैशांची वाहतूक करण्यात येत असल्यास कारवाई केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -