Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रकुर्ल्यात भरधास बेस्ट बसने अनेकांना चिरडलं; 20 जण जखमी, 3 मृत्यू

कुर्ल्यात भरधास बेस्ट बसने अनेकांना चिरडलं; 20 जण जखमी, 3 मृत्यू

कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडले आहे. तसेच अनेक वाहनांनादेखील जोराची धडक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेतील जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मुंबई महापालिकेने या घटनेतील जखमी आणि मृतकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

 

अपघातग्रस्त बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद होता, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा अपघात बुद्ध कॉलनी जवळील आंबेडकर नगर येथे झाला.

 

भरधाव बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली, अनेक पादचाऱ्यांना अक्षरश: चिरडलं. बेस्ट बसने अनेक रिक्षांना धडक दिली त्या रिक्षांमध्ये प्रवासीदेखील होते. अनेक वाहनांना आणि नागरिकांना उडवल्यानंतर ही बस पुढझे आंबेडकर नगरच्या कमानीत घुसली आणि तिथेच थांबली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -