महायुती सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण सर्वात जास्त जागा या भाजपच्या निवडून आल्याने त्यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास नकार दिला. मग जर उपमुख्यमंत्रिपद स्विकारायचं असेल तर गृहमंत्रिपद शिवसेनेला देण्यात यावं, असा आग्रह शिंदे गटाचा होता. 5 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर शिंदे गटाकडून वारंवार गृहमंत्रिपदावर दावा सांगितला जात आहे. शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
गृहमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे साहेबांना गृहमंत्रिपद मिळावा यासाठी आमच्या सर्वसामदारांनी आग्रह हा धरलेला होता. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद मिळावं हा आग्रह आम्ही अजून सुद्धा सोडलेला नाही. जरी आमचा आग्रह असला तरी त्याबाबत अधिकार हा एकनाथ साहेबांचा आहे आणि तेच याबाबत निर्णय घेतील, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सर्व अधिकार आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. तिन पक्षाचे नेते जेव्हा एकत्र बसतील. त्यावेळेस निर्णय होईल शपथविधी हा मंत्रिमंडळ विस्तार 100% होणार आहे. तीन पक्ष असल्याने थोडावेळ लागतो आहे मात्र विस्तार हा लवकरात लवकर होईल. किती खाते आम्हाला मिळतील हे सुद्धा मला माहित नाही. हे सुद्धा सर्वाधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. किती मंत्री पद घ्यावीत कोणती खाते घ्यावेत हे सर्वाधिकारकनाथ शिंदे साहेबाचे आहेत. त्यामुळे आमच्या कुठल्याही मंत्र्याचं असं स्टेटमेंट आहे की आम्हाला एवढ्या मंत्री पद मिळतील किंवा मला एवढे खाते मिळेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला कोणतं मंत्रिपद मिळेल? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा कुणाला कोणतं मंत्री पद पाहिजे हे आम्ही कोणीही आमच्या नेत्याला सांगायला गेलेलं नाही. आमचा नेता हा दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. ते काम करत असल्याने त्यांना पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करणार त्रास देणार आमच्या आमदारांना आवडत नाही. त्यांना मी सांगितला आहे की जी जबाबदारी तुम्ही आम्हाला द्याल ती आम्ही 100% पार पाडू, असं त्यांनी म्हटलं आहे.