Wednesday, February 5, 2025
Homeजरा हटकेअगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘हराभरा कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या

अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘हराभरा कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या

नेहमी ब्रेकफास्ट किंवा संधाकाळच्या नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडतो. झटपट आणि चविष्ट बनेल अशा रेसिपीच्या अनेकजण शोधात असतात. आज आपण झटपट होईल आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. ज्याचं नाव आहे, ‘हराभरा कबाब’.

 

साहित्य

1 वाटी पालक

कोथिंबिर बारीक चिरलेली

 

3,4 हिरवी मिरची

 

1 वाटी जाडे पोहे भिजवलेले

 

4,5 बटाटे उकडलेले

 

1 टीस्पून तिखट

 

1/2 टीस्पून हळद

 

1 टीस्पून धनेपुड

 

आले-लसूण पेस्ट

 

1 टीस्पून जीरा पावडर

 

1/2 टीस्पून आमचूर पावडर

 

मीठ चवीनुसार

 

1 वाटी कॉर्नफ्लॉवर

 

ब्रेड क्रंब्स

 

काजू

 

कृती

सर्वप्रथम सगळे साहित्य एकत्र करून घ्या. त्यानंतर पालक कोथिंबीर, हिरवी मिरची, जीरा पेस्ट तयार करून घ्या आणि भिजवलेले पोहे मध्ये बटाटे घालून मिक्स करून घेऊ.

 

त्यानंतर पालक पेस्ट आणि सगळे मसाले घालून घेऊ आणि कॉर्नफ्लॉवर घालून एक गोळा तयार करून घेऊ.

 

त्यानंतर एका प्लेटात ब्रेडक्रम्स दोन चमचे भिजवलेल्या कॉर्नफ्लॉवर पेस्ट तयार ठेव आता कबाब तयार करून पहिले कॉर्नफ्लॉवर पेस्ट त्यानंतर ब्रेडक्रम्स मध्ये छान परतून शॅलो फ्राय करून घेऊ.

 

वरून काजू लावून मध्यम गॅसवर शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे,तुम्ही तेलातून तळुण पण शकता.

 

गरमागरम हराभरा कबाब तयार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -