सरत्या वर्षाला म्हणजे 2024ला निरोप देता देता भारताने नवा इतिहास रचला आहे. भारताने पुन्हा एकदा अंतराळ भरारी घेतली आहे. ही भरारी घेतानाच भारताने अमेरिकेच्या नासासारख्या स्पेस एजन्सीला टक्कर देण्याचं काम केलं आहे. भारताच्या इस्रोने एक मोठा इतिहास रचला आहे. भारताने श्रीहरिकोटा येथून PSLV-C60 रॉकेटमधून 2 छोटे स्पेसक्राफ्ट लॉन्च केले आहेत. जेव्हा इस्रो पृथ्वीपासून 470 किलोमीटर वर दोन रॉकेट्सची डॉकिंग आणि अनडॉकिंग करणार हे पहिल्यांदाच घडणार आहे. म्हणजे हजारो किलोमीटरच्या वेगाने जाताना दोन स्पेसक्राफ्टला आधी जोडलं गेलं. त्यानंतर त्यांना पुन्हा वेगळं केलं जाणार आहे. SpaDex लॉन्च करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.
भारताने हे मिशन यशस्वी केल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. भारातने या मिशनला Space Docking Experiment म्हणजे SpaDex हे नाव दिलं आहे. विशेष म्हणजे भारताने या डॉकिंग सिस्टिमवर पेटंट घेतलं आहे ही गौरवाची बाब आहे. साधारणपणे कोणताही देश डॉकिंग आणि अनडॉकिंगमधील बारीकसारीक गोष्टी शेअर करत नाही. त्यामुळेच भारताला स्वत:चं डॉकिंग मॅकेनिझ्म बनवावं लागलं आहे.
PSLV-C60 रॉकेटद्वारे लॉन्च
अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवणे आणि चंद्रयान-4च्या यशाचं स्वप्न आता या मिशनवर अवलंबून आहे. या मिशनमध्ये दोन स्पेसक्राफ्ट समाविष्ट आहेत. एकाचं नाव टार्गेट म्हणजे लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्याचं नाव चेजर यांनी पाठलाग करणारा असं ठेवलं आहे. दोन्हींचं वजन 220 किलोग्रॅम आहे. PSLV-C60 रॉकेटने 470 किमी उंचावर दोन्ही स्पेसक्राफ्ट वेगवेगळ्या दिशेने लॉन्च केले जाणार आहेत.
डॉकिंग प्रक्रिया समजून घ्या
या दरम्यान टार्गेट आणि चेजरचा वेग ताशी 28 हजार 800 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. लॉन्चच्या सुमारे 10 दिवसानंतर डॉकिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे टार्गेट आणि चेजरला आपआपसात जोडलं जाणार आहे. सुमारे 20 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरून चेजर स्पेसक्राफ्ट टार्गेट स्पेसक्राप्टच्या दिशेने जाईल. त्यानंतर हे अंतर कमी होऊन 5 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर दीड किलोमीटर होईल. त्यानंतर 500 किलोमीटर होईल.
जेव्हा चेजर आणि टार्गेटच्या दरम्यान 3 मीटरचं अंतर असेल तेव्हा डॉकिंग म्हणजे दोन्ही स्पेसक्राफ्टच्या जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. चेजर आणि टार्गेट जोडल्या गेल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर केलं जाईल. या सर्व प्रक्रियेला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाणार आहे. इस्रोसाठी हे मिशन एक मोठं एक्सपेरिमेंट आहे. कारण भविष्यातील स्पेस प्रोग्राम या मिशनवर अवलंबून आहेत.