रिलायन्स जिओने आपला 189 रुपयांचा स्वस्त प्लान पुन्हा एकदा लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने 479 रुपयांच्या प्लानसोबतच हा प्लान बंद केला होता. मात्र, युजर्सची मागणी लक्षात घेता कंपनीने पुन्हा हा प्लान लॉन्च केला आहे.
या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच डेटाचा लाभ मिळणार आहे.
जिओचा 189 रुपयांचा प्लान हा स्वस्त रिचार्ज प्लानपैकी एक आहे. रिलायन्स जिओच्या 189 रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड वॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. यासोबतच युचर्सला 300 एसएमएस फ्री मिळतात. या प्लानमध्ये युजर्सला दररोज 2GB इंटरनेट डेटा सुद्धा मिळतो. तसेच डेटा लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 64kbps इतका करण्यात येतो.
जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि यासोबतट जिओ क्लाऊड यांचेही सब्सक्रिप्शन युजर्सला मिळते. मात्र, या प्लानमध्ये युजर्सला जिओ सिनेमा प्रीमियम कॉम्प्लिमेंट्री सपोर्ट मिळत नाही. या प्ालनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे.
जिओच्या 189 रुपयांच्या प्री पेड प्लाननंतर युजर्सला मिळणारा दुसरा स्वस्त प्लान हा 198 रुपयांचा आहेय 198 रुपयांचा प्लान सुद्धा प्री पेड प्लान आहे. जिओच्या 198 रुपयांच्या प्री पेड प्लानमध्ये युजर्सला दररोज 2GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. हा इंटरनेट डेटा अनलिमिटेड 5G सह उपलब्ध आहे. या प्लानमध्ये युजर्सला OTT सब्सक्रिप्शनस सुद्धा मिळते. JioSaavn 14 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळते.
जिओचा वॉईस ओन्ली प्लान
ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना वॉईस ओन्ली प्लान्स लॉन्च करण्यास सांगितले. यानंतर जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी आपले वॉईस ओन्ली प्लान्स लॉन्च करण्यास सुरुवात केली. जिओने आपले दोन नवीन वॉईस ओन्ली प्री पेड प्लान्स लॉन्च केले. या प्लानची किंमत 1958 रुपये आणि 458 रुपये अशी आहे. जिओच्या 1958 रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी 336 दिवसांची आहे. तर 458 रुपयांच्या प्री पेड प्लानची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.