Wednesday, March 12, 2025
HomeनोकरीCISF मध्ये 10वी पाससाठी नोकरीची संधी! तब्बल 1161 जागांसाठी भरती, पगार 69000

CISF मध्ये 10वी पाससाठी नोकरीची संधी! तब्बल 1161 जागांसाठी भरती, पगार 69000

10वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने अलीकडेच कॉन्स्टेबल/ट्रेड्समन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू झाली आहे.

 

या भरतीच्या माध्यमातून 1161 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. CISF Bharti 2025

 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीय. आणि हो अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करावा. CISF Recruitment 2025

 

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) कॉन्स्टेबल /कुक 493

2) कॉन्स्टेबल / कॉबलर 09

3) कॉन्स्टेबल / टेलर 23

4) कॉन्स्टेबल / बार्बर 199

5) कॉन्स्टेबल / वॉशरमन 262

6) कॉन्स्टेबल / स्वीपर 152

7) कॉन्स्टेबल / पेंटर 02

8) कॉन्स्टेबल / कारपेंटर 09

9) कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन 04

10) कॉन्स्टेबल / माळी 04

11) कॉन्स्टेबल / वेल्डर 01

12) कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक 01

13) कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट 02

 

शैक्षणिक पात्रता:

कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण

उर्वरित पदे : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

वयोमर्यादा :

1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे असावे.

SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयाची सवलत देण्यात आली आहे.

 

अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा शुल्क :

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 एप्रिल 2025

जनरल आणि OBC उमेदवारांसाठी – ₹100

SC/ST आणि माजी सैनिक (ExSM) उमेदवारांसाठी – शुल्क माफ

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -