Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रभाजीपाल्याचे दर कोसळले,लागलेला खर्चही निघेना; शेतकरी आर्थिक संकटात.

भाजीपाल्याचे दर कोसळले,लागलेला खर्चही निघेना; शेतकरी आर्थिक संकटात.

राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर जमिनीवर आहेत.

बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर अत्यंत घसरले असून, शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाही.

खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या ३ ते १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या भाजीपाल्याचे घाऊक दर कोथिंबीर – 5 रुपये, मिरची – 12 रुपये, काकडी – 8 रूपये, गंगाफळ – 5 रुपये, मेथी – 6 रुपये, भोपळा – 10, टोमॅटो– 5 रुपये तर कोबी – 3 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे. त्यांना स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येत आहे. किचन बजेटवरील खर्च कमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -